Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुटुंब बाहेरगावी, चोरट्यांची संधी साधली; स्नेहकुंज नगरमध्ये लाखोंचे दागिने चोरीला!
    क्राईम

    कुटुंब बाहेरगावी, चोरट्यांची संधी साधली; स्नेहकुंज नगरमध्ये लाखोंचे दागिने चोरीला!

    editor deskBy editor deskOctober 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाव्ळीसगाव :  प्रतिनिधी 

    शहरातील धुळे रोड परिसरातील सोहकुंज नगरमध्ये बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सुमारे १ लाख ७४ हजारांचे दागिने लंपास केले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,   या संदर्भात स्नेहकुंज नगरमधील नितीन प्रकाश पवार (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. पवार हे कुटुंबासह स्नेहकुंज नगरमध्ये राहत असून ते नांलदा हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपिक आहेत. दरम्यान, त्यांच्या पत्नीवर मुंबई येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते ९ ऑक्टोबरला रात्री घराला कुलूप लावून पत्र ीसह मुंबईला गेले होते. तर, त्यांची दोन्ही मुलेही गावी गेली होती. दरम्यान, १२ ऑक्टोबरला दुपारी १२.४० वाजता त्यांचा मुलगा घरी आला असता, त्याला घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडलेले आणि लाकडी दरवाजाचे कुलूप उघडलेले आढळले. त्याने तत्काळ वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर नितीन पवार यांचे मित्र आणि मुलाने घरात पाहणी केली असता, साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील लाकडी कपाट उघडे असून, त्यातील सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले.

    चोरट्यांनी सुमारे ९० हजाराची ३० ग्रॅमची सोन्याची मंगळपोत, १५ हजारांचे पाच ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, सहा हजारांचे दोन ग्रॅमचे सोन्याचे कानातले, १५ हजारांच्या सोन्याच्या रिंगा, सहा हजारांच्या सोन्याच्या बाळ्या, तीन हजारांच्या दोन सोन्याच्या नथ, ३० हजारांचे दहा ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, सहा हजारांच्या चांदीच्या पायातील दोन साखळ्या आणि तीन हजारांचे चांदीचे कडे चोरुन नेले आहेत. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ७४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत. दरम्यान, शहरातील बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन या घटनांना आव्ळय घालण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    व्यसनापासून दूर रहा – डॉ.निलेश चांडक

    October 15, 2026

    ‘पुढे खून झालाय’ म्हणत अडवले; पोलिसांच्या वेशातील भामट्यांनी वृद्ध दाम्पत्याला लुटले!

    October 15, 2026

    इन्स्टाग्रामवरून अश्लील संदेश अन् धमक्या; अल्पवयीन मुलीच्या तक्रारीने प्रकरण उघड!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.