Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
    जळगाव

    आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

    editor deskBy editor deskOctober 6, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

    महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण तसेच जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ.सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

    या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रम्मुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

    विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन उत्पादन प्रकल्पामध्ये अणि संशोधन इत्यादीवर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपल्ब करून देण्याची तरतूद आहे. या सहकार्यमुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रालया प्रसाराला चालना मिळणार आहे.

    जैन इरिगेशन समवेत झालेल्या या करारामुळे शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा मजबूत पाया

    कराराचे प्रमुख उद्देश

    * आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, डिजिटल शेती आणि काटेकोर शेती क्षेत्रात संयुक्त संशोधन.

    * विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे.

    * कृषी क्षेत्रातील समस्यांवर संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रसार.

    * पाणी व खतांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीसाठी सहकार्य.

    * संशोधनाचे प्रमुख विषय

    * आधुनिक सूक्ष्म सिंचन व स्वयंचलित सिंचन प्रणाली

    कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन

    सिंचनाद्वारे विद्वाव्य खतांचा कार्यक्षम वापर

    भूपुष्ठाखालील ठिबक सिंचन

    पीकनिहाय सिंचन वेळापत्रक व पाण्याचा काटेकोर वापर

    सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन व एकात्मक कीड व रोग व्यवस्थापन

    ड्रोनद्वारे फवारणी, उपग्रह प्रतिमांचा समावेश

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधाच्या विरोधाचा वाद जीवावर बेतला : धमक्यांच्या त्रासातून २८ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

    October 6, 2026

    चिमुकला शाळेतून घरी आला अन्‌ वडिलांना गमावून बसला !

    October 6, 2026

    ढापा नसलेल्या गटारीत दुचाकी कोसळली; ३७ वर्षीय नवल सोनवणेंचा दुर्दैवी मृत्यू!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.