Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
    जळगाव

    रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहारावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपड्यातील ‘वाणी’च्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : भडगाव येथे गोडाऊनमध्ये रेशनचा माल आढळून आल्याच्या घटनेनंतर शासकीय धान्याच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे संभाजीनगर येथेही रेशन धान्याच्या कथित मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने या संपूर्ण व्यवहाराची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

    जळगाव जिल्ह्यात विशेषतः चोपडा परिसरात रेशन धान्याच्या कथित गैरव्यवहाराबाबत ‘वाणी’ नामक व्यक्तीचे नाव चर्चेत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्यक्तीचा रेशन धान्याच्या व्यवहाराशी नेमका काय संबंध आहे? त्याचे कोणकोणाशी आर्थिक अथवा व्यावसायिक व्यवहार आहेत? याची प्रशासनाने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
    ‘हप्ते’ दिल्याच्या आरोपांचीही चौकशी व्हावी
    रेशन धान्याच्या कथित काळाबाजाराला प्रशासनातील काही घटकांचे संरक्षण मिळते का, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

    संबंधित व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ दिल्याचे आरोप होत असतील, तर त्याची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. मात्र, हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून संबंधित यंत्रणेने त्याची सत्यता तपासणे गरजेचे आहे.
    प्रशासनातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

    मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासल्यास सत्य बाहेर येणार?

    या प्रकरणात संबंधित ‘वाणी’ यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डची (CDR) तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार उपलब्ध असलेल्या संपर्क व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित काळातील संशयास्पद संपर्कांची तपासणी केल्यास रेशन धान्याच्या व्यवहाराशी संबंधित व्यक्ती अथवा अधिकाऱ्यांपर्यंत तपासाची दिशा पोहोचू शकते, असा दावा केला जात आहे.

    …गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला?

    शासकीय रेशन व्यवस्था ही गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आधार आहे. त्यामुळे रेशनचा माल बेकायदेशीररीत्या वळविला जात असेल, तर हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून गरिबांच्या हक्कावर घाला असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

    भडगावमधील कारवाई आणि संभाजीनगरमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रेशन धान्याच्या संपूर्ण साखळीचे ऑडिट करून चोपडा परिसरातील कथित रॅकेटची पाळेमुळे उखडून काढावीत, अशी मागणी होत आहे. केवळ छोट्या-मोठ्या कारवायांपुरते न थांबता या व्यवहारामागील कथित सूत्रधार, वाहतूकदार, व्यापारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासली तरच या प्रकरणाचा खरा चेहरा समोर येईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गुलाल उधळताना वाद पेटला : दोन भावांवर दगडफेक; नातेवाईकांच्या कारचीही तोडफोड

    September 16, 2026

    पोषण आहाराच्या धान्याच्या टेम्पोला अपघात; दोन हमालांचा दुर्दैवी मृत्यू

    September 16, 2026

    किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांनी ४ लाखांचा गुटखा पकडला !

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.