Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावलमध्ये तीन आत्महत्यांनी खळबळ; दोघा तरुणांचा गळफास, एकाचा विहिरीत मृतदेह !
    क्राईम

    यावलमध्ये तीन आत्महत्यांनी खळबळ; दोघा तरुणांचा गळफास, एकाचा विहिरीत मृतदेह !

    editor deskBy editor deskSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    यावल शहर व तालुक्यातील तिघांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रहिवासी व सांगवी खुर्द येथील रहिवाशी अशा दोघा तरुणांनी गळफास घेतला तर दहिगाव येथील एकाने विहिरीत उडी घेतली. या तिघा प्रकरणात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद न करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चोपडा रस्त्यावर इंदिरा गांधी ची हायस्कूलच्या शेजारील डांगपुरा भागात शेख मुजाहिद र्फ शेख मुन्शी मोमीन (वय ३९) या तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी रात्री निदर्शनास आला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत सांगवी खुर्द या गावातील रहिवासी प्रमोद श्रावण गोसावी (वय ४१) याने देखील आपल्या पायाच्या आजाराला कंटाळून वायरच्या साह्याने गळफास घेतला.

    त्यालाही ग्रामीण रूग्णालय यावल येथे आणले डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तसेच दहिगाव ता. यावल येथील रहिवाशी नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील (वय ३६) यास दारूचे व्यसन होते. त्याचे व्यसन सोडवून आणले होते व अचानक दारू बंद झाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते व तो घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह सोमवारी दुपारी शेतातील विहित मिळून आला. या तिघांच्या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी, पोलिस हवलदार उमेश महाजन, पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली !

    September 1, 2026

    माहेरी आली अन् आयुष्याची अखेर झाली : १९ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

    September 1, 2026

    जळगावात ‘एमडी’चा महाकाय साठा : ४ किलो ९०० ग्रॅम ड्रग्ज जप्त; किंमत सव्वा कोटी !

    September 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.