Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा धरणाचे दरवाजे आज उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
    चाळीसगाव

    गिरणा धरणाचे दरवाजे आज उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 31, 2026Updated:July 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील :जळगाव प्रतिनिधी : गिरणा मोठा प्रकल्पात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने आज, 31 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता गिरणा धरणाचे दरवाजे उघडून 1,000 ते 2,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिली आहे.

    आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरणात 97.06 टक्के पाणीसाठा झाला असून, सध्या धरणात 10,000 ते 15,000 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गातही वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठावरील पशुधन, शेतीतील मोटार पंप, साहित्य व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नदीपात्रात सुरू असलेल्या विविध विभागांच्या बांधकामांवरील साहित्य आणि यंत्रसामग्रीही तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

    July 28, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.