विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : वाढदिवस साजरा करताना करूया विचार, पडत्या पावसात देऊया गरजूंना आधार. हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवला.
वाढदिवसानिमित्त बुके, केक, बॅनर यावर अनावश्यक खर्च न करता तो निधी गरजूंसाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंप्राळा स्टॉप येथे आयोजित कार्यक्रमात वार्डातील सफाई कर्मचारी, आशा वर्कर, वायरमन आणि पोस्टमन यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे समाजातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मा. अमर जैन, अतुल बारी, सागर पाटील, रवींद्र कोळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, निलेश पाटील, नरसिंग पाटील, मयूर जाकिटे, मयूर चौधरी, रवींद्र थुदगर, शिवाजी सूर्यवंशी, नितीन राजपूत, राकेश राजपूत, स्वप्निल विधाते, लोटन पाटील, प्रदीपसिंग पाटील, शांताराम बारी, जितेंद्र पाटील, प्रणव पाटील, घनश्याम सोनवणे, दशरथ पुजारी आणि प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



