विजय पाटील जळगाव : जिल्ह्यात बहुचर्चित शालार्थ आयडी जवळपास 638 शिक्षकांचे असून यात अमळनेर हे केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे मनोज वर विश्वास ठेवून मराठा समाजाच्या अनेक मातब्बर नेत्यांनी या बोगस शालार्थ आयडी मध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे मोठ्या अडचणी मराठा समाजाच्या नेत्यांच्या वाढले आहेत.
कार्यालयीन सचिव दिपक गरुड यांनाही नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जवळपास या गुन्ह्यात बाराशे संशयित आरोपी असून सर्वाधिक आरोपींची संख्या जळगाव जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात 842 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यात जळगाव जिल्ह्यात 638 शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे आयडी आढळले आहे. विशेष म्हणजे संजय गरुड यांना आयडी तयार करून देण्यास मदत करण्यासाठी जळगाव शहरातील रहिवासी तथा जिल्ह्यात अनेक ज्ञात अज्ञात शिक्षण संस्था असलेला संस्थाचालक व सरकारी नोकरांच्या सहकारातील ज्येष्ठ नेते मनोज हा मार्गदर्शक असल्याची माहिती समोर आली आहे.



