Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न
    जळगाव

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी: शहरातील पिंप्राळा शिवारातील देवकर नगरजवळील जाणता राजा नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिव मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवारी (दि. १६ जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

    या मंदिराचे भूमिपूजन आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांनी शिव मंदिराच्या उभारणीसाठी परिसरातील नागरिकांचे अभिनंदन करत धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

    कार्यक्रमाला नगरसेवक अतुल बारी, पठाण दादा आणि नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचा परिसरातील नागरिकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    या सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सपना सोनवणे (कोळी) आणि उपाध्यक्ष सविता पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने केले. कार्यक्रमाला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाआरती आणि प्रसाद वाटपाने धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026

    पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ

    July 17, 2026

    आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; जळगावातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.