भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील लकीबा नगर परिसरात गुरुवारी (दि. ११) एका अनोळखी तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आत्महत्येसह घातपाताचीही शक्यता व्यक्त केली जात असून बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा मृतदेह हिरव्या रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष बाब म्हणजे ज्या झाडाला मृतदेह लटकलेला होता सुमारे २० ते २५ वर्षांपासून बंद असलेल्या घराच्या छतावरून जावे लागते. त्यामुळे मृतदेह झाडाला लटकविण्यात आला असावा, अशी शक्यता नाकारता त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळच असलेल्या येत नसल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे.
सदर घराचे मालक श्रीकांत पाठक असून ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा पाठविले. केला तसेच शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या की घातपात याबाबत विविध शक्यता तपासल्या जात असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



