Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ; एलपीजी सिलिंडर ८९ रुपयांनी महागला
    जळगाव

    तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरवाढ; एलपीजी सिलिंडर ८९ रुपयांनी महागला

    editor deskBy editor deskJune 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर रविवार मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ₹913 वरून ₹942 वर पोहोचली आहे.

    विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा घरगुती एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलिंडरच्या दरात ₹60 ची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत घरगुती सिलिंडर एकूण ₹89 रुपयांनी महागला आहे.

    न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढल्याने आणि घरगुती गॅस विक्रीवर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती एलपीजी सिलिंडरमागे सुमारे ₹703 चे नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. नव्या दरवाढीनंतरही या नुकसानीची केवळ अंशतः भरपाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    यापूर्वी 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ₹50 ची वाढ करण्यात आली होती. तसेच 1 मार्च 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही ₹31 पर्यंत वाढ करण्यात आली होती.

    दरम्यान, 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ₹11 ची वाढ करण्यात आली असून त्याची किंमत आता ₹821.50 झाली आहे. गॅसबरोबरच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीतही अलीकडच्या काळात सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकूण ₹7.50 प्रति लिटरने वाढल्या असून सीएनजी सुमारे ₹6 प्रति किलोने महाग झाली आहे.

    तेल कंपन्यांच्या मते, पेट्रोलवर सुमारे ₹11 प्रति लिटर आणि डिझेलवर ₹33.60 प्रति लिटर नुकसान होत आहे. तरीही ग्राहकांवर जागतिक बाजारातील वाढीचा संपूर्ण भार टाकलेला नसल्याचा दावा सरकारने केला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीचा काही भाग सरकारी तेल कंपन्याच उचलत असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे.  गॅस, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यसभेसाठी नवनीत राणांचे लॉबिंग? सुनेत्रा पवार-फडणवीस भेटींनी चर्चांना उधाण

    June 7, 2026

    भीषण अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू : स्कॉर्पिओ चालकाला अटक

    June 7, 2026

    भर रस्त्यावर तरुणीचा विनयभंग : गुन्हा दाखल !

    June 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.