Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक कामात दिरंगाई; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल!
    क्राईम

    निवडणूक कामात दिरंगाई; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल!

    editor deskBy editor deskJune 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    निवडणूक विषयक कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरातील १३ बीएलओ कर्मचाऱ्यांवर जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४) यांनी ३ जून रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी जळगाव शहरात ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती.

    भुसावळ सत्र न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. गुरुवारी न्यायालयाने अंतिम निकाल देताना स्पष्ट केले की, ‘हा गुन्हा अत्यंत गंभीर, क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा आहे.’ हे नमूद करत न्यायालयाने नराधम महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीत न्यायालयाने सुनावलेली ही ४९ वी फाशीची शिक्षा आहे.

    विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना अॅड. प्रवीण भोंबे, अॅड. संभाजी जाधव यांनी सहाय्य केले, तर आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात सरकारी वकील राजीव तडवी, रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचीही उपस्थिती होती.

    ज्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात अर्जुन काशीनाथ ठाकरे (शिक्षक, प्रतिभा माध्यमिक विद्यालय) फारुक शहा हनीफ शहा (युनिक प्राथमिक उर्दू शाळा, मेहरूण), शुभम रमेश गजभिये (लिपिक, मनपा शाळा), हितेंद्र विलास जोशी (शिक्षक, ला. ना. विद्यालय), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल, सुप्रीम कॉलनी), हुसेन सरदार तडवी (मनपा उर्दू शाळा, सुप्रीम कॉलनी), मोहम्मद परवेज हुसेन (मनपा उर्दू शाळा), भागवत तुळशीराम भावसार (शारदा माध्यमिक विद्यालय), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रताप शाळा), कोमल नीलकंठ तायडे (लिपिक, शासकीय तंत्रनिकेतन), कल्पेश गोपाल पवार (लिपिक, मनपा जळगाव), संजीव नामदार तडवी (शिक्षक, मुंदडा शाळा), कल्पेश यशवंत पाटील (लिपिक, जिल्हा परिषद) यांचा समावेश आहे.

    ज्या कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला, त्यांना १९ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या बैठकांमध्ये तसेच व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार सूचना व नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही १३ बीएलओ कर्मचाऱ्यांनी कामात कोणतीही सुधारणा न करता सरकारी आदेशाचे उल्लंघन केले. अखेर जळगावचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शासनाच्या योजनेतही भ्रष्टाचार: संचासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी जाळ्यात

    June 5, 2026

    चार निष्पाप भावंडांच्या हत्याकांडातील नराधमाला दुहेरी फाशी!

    June 5, 2026

    फोन उचलला नाही म्हणून संताप; प्रेयसीच्या घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.