Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार निष्पाप भावंडांच्या हत्याकांडातील नराधमाला दुहेरी फाशी!
    क्राईम

    चार निष्पाप भावंडांच्या हत्याकांडातील नराधमाला दुहेरी फाशी!

    editor deskBy editor deskJune 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील एका शेतात चार निष्पाप भावंडांच्या निघृण हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आरोपी महेंद्र सीताराम बारेला (२६, रा. केहऱ्हाळे, ता. रावेर) याला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष जलद न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. यादव यांनी गुरुवारी हा निकाल दिला. हे हत्याकांड १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडले होते.

    बोरखेडा गावाजवळ एका शेतात एक दाम्पत्य आपल्या पाच मुलांसह सालदार म्हणून वास्तव्यास होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी हे दाम्पत्य काही आपल्या मूळ गावी (मध्य प्रदेश) गेले होते. याचा गैरफायदा घेत महेंद्र बारेला याने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला; तसेच पीडितेच्या तीन निष्पाप भावंडांवरही कुन्हाडीने सपासप वार केले. १६ ऑक्टोबरच्या सकाळी शेतमालक जेव्हा झोपडीजवळ गेले, त्यावेळी बाल हत्याकांडाचा हा प्रकार समोर आला.

    भुसावळ सत्र न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. गुरुवारी न्यायालयाने अंतिम निकाल देताना स्पष्ट केले की, ‘हा गुन्हा अत्यंत गंभीर, क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा आहे.’ हे नमूद करत न्यायालयाने नराधम महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीत न्यायालयाने सुनावलेली ही ४९ वी फाशीची शिक्षा आहे.

    विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना अॅड. प्रवीण भोंबे, अॅड. संभाजी जाधव यांनी सहाय्य केले, तर आरोपीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी बाजू मांडली. न्यायालयात सरकारी वकील राजीव तडवी, रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचीही उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शासनाच्या योजनेतही भ्रष्टाचार: संचासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी जाळ्यात

    June 5, 2026

    निवडणूक कामात दिरंगाई; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल!

    June 5, 2026

    फोन उचलला नाही म्हणून संताप; प्रेयसीच्या घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.