Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ हादरले : पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण; २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    भुसावळ हादरले : पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण; २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    editor deskBy editor deskJune 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    व्हीआयपी रात्री कॉलनी परिसरात २९ मे रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगेश अंबादास काळे (२६, व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात सुरुवातीला जीवघेणा हल्ला व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली.घटनास्थळी नागरिक जमा होऊ लागल्याने आरोपी तेथून पसार झाले. जखमी मंगेश यांना मित्रांच्या मदतीने भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने ३१ मे रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, १ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मंगेश काळे यांचा मृतदेह मुंबईहून भुसावळ येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    दि. २९ मे रोजी रात्री ११ वाजता मंगेश काळे हे पत्नी पायल यांच्यासह घरात असताना कुंदन पठाडे, रोहित नवगिरे ऊर्फ दादू, विशाल गैंगाट, बाबा गैंगाट, अंकित आणि भावेश हे तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी हल्ला चढवला. कुंदन याने लोखंडी रॉडने, रोहित नवगिरे याने लाकडी दांड्याने, तर विशाल गेंगाट याने हॉकी स्टिकने मारहाण केली. पत्नी पायल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर धक्काबुक्की केली. जीव वाचविण्यासाठी मंगेश यांनी छतावरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा रॉड, लाठ्या आणि हॉकी स्टिकने मारहाण केली. घाबरलेल्या पायल यांनी घरात जाऊन दरवाजा बंद केला आणि पोलिसांच्या ‘११२’ हेल्पलाइनवर संपर्क साधला.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी २ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यास भेट देत प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके कार्यरत केली आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तापी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू

    June 3, 2026

    १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवे वळण; तब्बल २ महिने २० दिवसांनी सांगाडा बाहेर काढला!

    June 3, 2026

    जिल्ह्यातील भाजप राजकारणाला कलाटणी देणाऱ्या विधान परिषद निवडणुकांचा इतिहास!

    June 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.