Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला
    क्राईम

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    editor deskBy editor deskApril 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होत असून, शाब्दिक चकमकींनी वैयक्तिक पातळी गाठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार नवनीत राणा यांच्या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

    माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी नवनीत राणांवर टीका करताना म्हटले की, “त्या स्वतःला मोठं समजतात आणि इतरांना कमी लेखतात. ‘सी-ग्रेड’ चित्रपटातील अभिनेत्री असल्यामुळे त्या स्वतःला ‘ग्रेट’ समजत असाव्यात.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्नी नवनीत राणांवर झालेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी वडेट्टीवारांवर हल्लाबोल केला. “एखाद्या महिलेबद्दल अशा हीन दर्जाची भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी वडेट्टीवारांना इशारा दिला.

    रवी राणा पुढे म्हणाले, “वडेट्टीवारांनी आपल्या मर्यादेत राहून बोलावे. जेवढा पगार मिळतो, तेवढेच बोलावे. आपली पातळी सोडून वायफळ बडबड करून स्वतःचा कचरा करू नये.” त्यांच्या या विधानामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    या संपूर्ण प्रकरणामुळे विदर्भातील राजकारण तापले असून, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी भाषेची पातळी राखावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना हा वाद नेमका कुठे थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    April 27, 2026

    भोंदूगिरीला महाराष्ट्रात थारा नाही : रोहित पवारांचा हल्लाबोल !

    April 27, 2026

    मराठी सक्तीवरून राजकारण तापले; मनसेला डावलल्याने सरकारवर टीकेची झोड !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.