Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण
    क्राईम

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    editor deskBy editor deskApril 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास कसून चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याला अचानक छातीत वेदना, तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी तातडीने वैद्यकीय मदत बोलावली.

    खरातला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला असून कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी न्यायालयात वैद्यकीय तपासणीची मागणी केली होती. खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सतत डोकेदुखीचा त्रास होत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्याला न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अचानक प्रकृती खालावल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    दरम्यान, एसआयटीने या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवला असून खरातशी संबंधित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकालाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. सुमारे सहा तास चाललेल्या चौकशीत आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि इतर संबंधांची सखोल माहिती घेतल्याचे समजते. चौकशीनंतर त्या व्यावसायिकाला उशिरा रात्री सोडण्यात आले.

    अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. नव्या पुराव्यांच्या आधारे एसआयटीकडून पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तपास पुढे सरकत असताना या प्रकरणातून धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.

    सोलापूरमधील शेतकऱ्याचे गंभीर आरोप

    या प्रकरणाला आणखी एक कलाटणी देत सोलापूर जिल्ह्यातील कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांनीही खरातविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ११ एकर जमीन दीड कोटी रुपयांना घेण्याचे आश्वासन देऊन केवळ ५० लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उर्वरित रक्कम मागितल्यावर जादूटोण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांकडे तक्रार सादर करण्यात आली आहे.

    एकूणच, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत असून तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    चिंचोलीत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 22, 2026

    महिलेवर धारदार चाकूने वार ; तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.