जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील तरुणाचा जळके गावाजवळील रस्त्याच्या वळणावर अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सकाळी समोर आली आहे. . हा तरुण दिनांक २०एप्रिल रोजी घरुन काम निमित्ताने बाहेर गेला होता परंतु तो रात्री उशिरा पर्यंत घरी परतला नाही .
मिळालेल्या माहितीनुसार, वसंतवाडी येथील रवींद्र रुपचंद चव्हाण वय वर्षे ३७ हा तरुण आपल्या मोटारसायकलने वावडद्याकडुन घरी परतत असताना जळके गावाजवळील रस्त्याच्या वळणावर अपघात होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या केळीच्या शेतात त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH 19 EK 3530 सह मृत अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती शेत मालक नथ्यु पाटील यांनी जळके पोलीस पाटील संजय चिमणकारे यांना दुरध्वनी द्वारे कळविले की आमच्या शेतात कोणीतरी व्यक्ती मोटारसायकल सह पडलेला आहे त्यानंतर पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व मोटारसायकल तसेच या तरुणाचा चेहरा पाहील्यानंतर हा तरुण आपल्या तांडयातील रवींद्र चव्हाण असल्याचे लक्षात येताच त्यांनी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन येथे कळविले तसेच त्यांच्या नातेवाईकांना कळविले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तांड्यावर शोककळा पसरली व त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली. वळणावर यापूर्वीही बरेच अपघात झाले असून त्यातील तीन ते चार अपघातात जीवही गेलेले आहेत मात्र तरीदेखील P.E.D.विभागाकडुन कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे येथील नागरीकांमध्ये बोलले जात आहे . हा तरुण दिनांक २०एप्रिल रोजी घरुन काम निमित्ताने बाहेर गेला होता परंतु तो रात्री उशिरा पर्यंत घरी परतला नाही.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो. कॉ.राहुल बोरसे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता . शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत



