Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !
    जळगाव

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    editor deskBy editor deskMarch 21, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विकासकामांचा धडाका — रस्ते, काँक्रिटीकरण व इतर कामांचेही लोकार्पण व भूमिपूजन

    जळगाव   : प्रतिनिधी 

    दोन वर्षांपूर्वी नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांनी मागील काळातील आपल्या आंदोलनाच्या दिवसांची आठवण करून देत सांगितले की, “पूर्वी शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन केले. आज त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढत आहोत.” शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या तीन मूलभूत गरजा अत्यंत महत्त्वाच्या असून त्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे. मतदारसंघात तसेच जिल्ह्यात वीज समस्या दूर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्रे व इतर सुविधा मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आल्या आहेत. जळगाव – धरणगाव तालुक्यात सुमारे ₹32 कोटींच्या निधीतून उपकेंद्र, रोहित्रे व लाईन सुधारणा सुरू आहे. नंदगाव उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार असून ग्रामस्थांना 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. भविष्यात गरज भासल्यास येथे 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार अशी ग्वाही देत याशिवाय परिसरातील सुमारे ₹150 कोटींच्या भोकर पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देत, “सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुम्हीही विकासाच्या कामांना साथ द्या,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

    महाराष्ट्र कृषी धोरण 2020 योजनेअंतर्गत 4 कोटी खरच करून उभारलेल्या नंदगाव येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच ग्रामस्थांना 24 तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नंदगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹15 लाख), पिलखेडा येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता व गावांतर्गत काँक्रिटीकरण (₹30 लाख) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नंदगाव – फेसर्डी – किनोद ग्रा.मा. 40 या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ₹60 लाखांच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता श्री. कपुरे यांनी वीज उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. तर आभार विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी मानले.

    याप्रसंगी विष्णू भंगाळे, अनिल भोळे, पवन सोनवणे, शिवराज पाटील, गजानन सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, कैलास चौधरी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, उपकार्यकारी अभियंता विजय कपूरे, शाखा अभियंता पाटील दिनेश पाटील, चंद्रकिरण सोनवणे, दूध संघाचे रमेश आप्पा, दत्तू आबा सोनवणे, कमलाकर बोरसे, पाटील नवीन पाटील, कृष्णा सोनवणे, बापू धनगर, डॉ. कमलाकर पाटील, गोपाल जीभाऊ, शिवाजी सोनवणे, प्रमोद सोनवणे, योगेश लाठी, सरपंच रोहिणी साळुंखे, निलेश साळुंखे, पंकज चौधरी, योगेश पाटील, संदीप पाटील, नितीन सपकाळे, जितू पाटील, समाधान पाटील, जळगाव मनपाचे नगरसेवक गणेश सोनवणे, हर्षल मावळे, अजय पाटील, शाखा अभियंता पाटील यांच्यासह नांदगाव, फेसरडी, पिलखेडा, भादली खुर्द परिसरातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026

    अमळनेरात कॉपी रोखली म्हणून संताप; होमगार्डवर रॉडने हल्ला

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.