Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आश्रम शाळेच्या मागील बाजूस आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह !
    क्राईम

    आश्रम शाळेच्या मागील बाजूस आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह !

    editor deskBy editor deskMarch 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक: वृत्तसंस्था

    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी गावात एका विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी 13 मार्चपासून बेपत्ता होता. काल संध्याकाळी आश्रम शाळेच्या मागील बाजूस असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे. संजय सदू नडगे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील स्वर्गीय मधुकरावर हिरे या अनुदानित शाळेमध्ये दहावीला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या दोन दिवसांपासून संजय हा बेपत्ता होता. कुटुंबीय आणि गावकरी हे विद्यार्थ्याचा शोध घेत असताना शाळेच्या मागच्या बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह झाडावरून खाली उतरवला आणि पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे आश्रम शाळा परिसरासह गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याबाबत अजूनतरी कुठली माहिती मिळाली नाहीये. या घटनेमागे कौटुंबिक कारण, शैक्षणिक ताण किंवा इतर काही कारण आहे का याचा तपासब पोलिस करत आहे. तसेच गावकऱ्यांकडून जातीय कारणांचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्या अॅंगलने देखील पोलीस तपास सुरू असून सदर घटनेमुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात दुचाकी चोरी प्रकरण उघड; मालेगावच्या तिघांना अटक

    March 16, 2026

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.