Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर
    Uncategorized

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 16, 2026Updated:March 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा निर्माणाधीन स्लॅब ( साचा )कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.
    या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.


    दरम्यान, या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले सेफ्टी शूज, हेल्मेट यांसारखी सुरक्षा साधने देण्यात आली होती का, तसेच कामगारांचा विमा काढण्यात आला होता का, याबाबतही आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, बांधकामात हलगर्जीपणा झाला का, याबाबत प्रशासनाकडून चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.