धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिताबाई सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदी सीताबाई सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सिताबाई सोनवणे याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आली. याप्रसंगी सरपंच कृष्णा संदाशिव, नाना बळीराम पाटील यांच्यासह ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.


