Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दुचाकींच्या धडकेत तरुण ठार !
    क्राईम

    दोन दुचाकींच्या धडकेत तरुण ठार !

    editor deskBy editor deskMarch 6, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    होळीच्या दिवशी मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने विरोदा येथील ४८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फैजपूर -भुसावळ मार्गावरील बामणोद गावाजवळील हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराचा पोलिस शोध घेत आहेत.

    विरोदा येथील रहिवासी तथा श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले (वय ४८) हे २ मार्च होळीच्या दिवशी बामणोद येथे कर्णछेदन कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री सुमारे १०:३० वाजता ते मोटरसायकलने विरोदा येथे परतत असताना आमोदेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघातात कपले गंभीर जखमी झाले.

    दरम्यान, अपघातानंतर आरोपी मोटरसायकलस्वाराने आपली ओळख पटू नये म्हणून वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या युवराज कपले यांना तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातग्रस्त दोन्ही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026

    वर्षभरासाठी सहा जणावंर हद्दपारीची कारवाई

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.