Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक: इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले ; दहा मृतदेहांची ओळख पटली
    अमळनेर

    धक्कादायक: इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले ; दहा मृतदेहांची ओळख पटली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 18, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

    एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतन चे वडील राम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी उम्र 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान,3.प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र,4.नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां,5. कमला भाई पति नीबाजी पाटिल वय 55 वर्षे राहणार सी पिलोदा अमलनेर जळगांव,6.चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमलनेर जलगांव (उपरोक्त 1 से 6 पर्यंत के मृतकाची ओळख आधार कार्ड व्दारे केलेली आहे),7.श्रीमती अरवा याचे पती मुर्तजा बोरा वय 27 वर्षे निवासी मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्रातील नातेवाईकांव्दारे ओळख, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर इंदौर नातेवाईकांव्दारे ओळख पटलेली आहे.९) चालक -चंद्रकांत एकनाथ पाटील व १०) वाहक-प्रकाश श्रावण चौधरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

    याशिवाय अद्याप तीन मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून.अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येते तसेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचा उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.एसटी महामंडळाकडून दुपारी १.३१ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार ही माहिती प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.

    अपघातस्थळी बचाव कार्य सुरू


    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येवुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आहेत अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी १.५० मिनिटांनी घेतलेल्या माहितीनुसार प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.