भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील श्रीराम नगरमध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ पसरली आहे. धिरज कोळी, हा पिंपळगाव येथील हरी किटकुल बढ़े प्राथमिक विद्यालयाचा शिकत होता. तो दि. १ रोजी दुपारी १ वाजता घरात एकटा असताना नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर प्लगमध्ये जोडत असताना अचानक शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडली त्यावेळी धिरजचे आई-वडील त्या वेळी शेतात गेले होते आणि तो घरात एकटा होता. अचानक झालेल्या या घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, सर्वत्र धिरजच्या मृत्यूची चर्चा सुरू आहे. धिरजच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. धिरज हा एक हुशार, मैत्रीशील आणि अभ्यासात उत्कृष्ट विद्यार्थी होता. शिक्षक आणि सहपाठीयांनी त्याच्या अचानक निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे.



