Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !
    क्राईम

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस आली असून प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना २८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिले. तीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

    प्राप्त माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अनिता या देवा धनगर यांना वेळ देत नसल्याने तो संतप्त झाला होता. रागाच्या भरात देवा धनगर हा अकुलखेडा येथे अनिता यांच्या घरी गेला. त्याने गावठी पिस्टलने अनिता यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

    या घटनेचा पुढील तपास अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या घटनेमुळे अकुलखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !

    February 28, 2026

    चेंबूरमध्ये मृत्यूचा थरार; ८० फूटांवरून ६ कामगारांचा पडझड, एक ठार !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.