Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !
    क्राईम

    आंध्र प्रदेशात फटाक्यांचा भीषण स्फोट; १८ ठार !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हातील वेटलापलेम गावात शनिवारी दुपारी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये २० हून अधिक कर्मचारी काम करत होते, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

    स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. आवाज इतका तीव्र होता की तो सुमारे पाच किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली.

    घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

    राज्याच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक

    February 28, 2026

    चेंबूरमध्ये मृत्यूचा थरार; ८० फूटांवरून ६ कामगारांचा पडझड, एक ठार !

    February 28, 2026

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.