Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक
    क्राईम

    पॅलेसमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरसह चौघांना अटक

    editor deskBy editor deskFebruary 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    अंधेरी परिसरात विदेशी महिलांना हाताशी धरून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ए. के. रोडवरील हॉटेल व्हिला पॅलेस येथे छापा टाकून पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह चार जणांना अटक केली असून दोन विदेशी महिलांची सुटका केली आहे.

    सहार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये काही विदेशी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावले जात होते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती समोर आली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाने आरोपींशी संपर्क साधून विदेशी महिलांची मागणी केली. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोगस ग्राहक हॉटेलमध्ये पोहोचला असता, तेथील कर्मचाऱ्यांनी त्याची दोन युगांडा देशातील महिलांशी ओळख करून दिली. पैशांचा व्यवहार सुरू होताच पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड केला.

    या कारवाईत हॉटेल मॅनेजर विवेककुमार वैद्यनाथ यादव, हाऊसकीपिंग कर्मचारी अनिलकुमार जोकू पुष्पाकर, धीरज मधुकर जांबळे आणि महेश राजपाल राजवरिया यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. प्राथमिक तपासात हॉटेलचा मालक अक्षय दिलीप शेटे आणि ‘जास्मिन’ नावाची केनियन नागरिक महिला हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना या प्रकरणात फरार आरोपी घोषित करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

    छाप्यात पोलिसांनी दोन विदेशी महिलांची सुटका केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी किती महिलांना अडकविण्यात आले आहे आणि रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास सहार पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे अंधेरी परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातानंतर फडणवीसांचा संवेदनशीलतेचा आग्रह; पतंगबाजी व गोळीबार टाळा

    February 28, 2026

    शिखर बँक प्रकरणात मोठी कलाटणी; सुनेत्रा पवार, अजित पवारांसह ७० जण निर्दोष

    February 28, 2026

    मध्यरात्रीचा वाद ठरला जीवघेणा; भुसावळात ४२ वर्षीय तरुणाचा खून !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.