Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !
    क्राईम

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील साई हॉटेलसमोर घडली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकी सुमारे ७ ते १० फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) व शाम यादव चौधरी (वय ३०) हे दोघे शेतातून मका कापणीचा सौदा करून दुचाकी (एमएच १९, डीबी २९५०) वरून घरी परतत होते. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच २०, सीटी-८०५३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील मागील बाजूस बसलेले ईश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक शाम चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, समोरून येणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही ट्रकची धडक बसली. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला.

    अपघातानंतर महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी तत्काळ जखमींना दुचाकीवरून पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. तसेच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाचा पाठलाग करून ऑटोचालक इमरान भाई यांनी मेट्रो वाईन शॉपजवळ त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक तपासात संबंधित ट्रक चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील बेफाम वेग आणि मद्यधुंद वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात !

    April 11, 2026

    महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात !

    April 11, 2026

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरा

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.