Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    क्राईम

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    editor deskBy editor deskFebruary 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने जिल्हापेठ हद्दीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’ तसेच एमआयडीसी परिसरातील ‘राज वाईन्स’ या दोन दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केली होती. सलग दोन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठित करण्यात आले.

    तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तसेच अंमलदार विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी आणि नेत्रम विभागाचे मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला. आरोपीकडून चोरीतील २ लाख ४ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे १ लाख रुपये किमतीची बजाज अव्हेंजर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.