Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नोकरी व्यवसायात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धनलाभाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील.
    राशीभविष्य

    नोकरी व्यवसायात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धनलाभाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील.

    editor deskBy editor deskFebruary 20, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजचे राशीभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२६ 

    मेष : आज तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. नोकरी व्यवसायात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धनलाभाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील. तुम्ही आज एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. रखडलेली कामे आजच्या दिवसात पूर्ण होतील. कुटुंबात मतभेद झाल्याने मन निराश असेल.

    वृषभ : आज तुम्हाला तुमच्या घरात प्रेम आणि सामंजस्य पहायला मिळेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर रिसर्च कराल ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. व्यापारी लोकांना प्रामाणिकपणे काम करावे लागेल अन्यथा मोठ्या विवादीत प्रकरणात सापडू शकता. प्रेमसंबंध दृढ होतील. ​

     

    मिथुन : आज तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आणि फायदेशीर ठरणारा असेल. कुटुंबातील नात्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्याने अधिक दृढता येईल. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार करू नका नुकसान होईल.

    कर्क : आज तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचे विचार मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या कल्पनांची प्रशंसा होईल. कामात आज तुम्हाला प्रगती होताना दिसेल. कुटुंबातील एखादा व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवू शकतो. व्यावसायिकांसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. खर्चांवर नियंत्रण करावे लागेल.

    सिंह : आज तुम्हाला तुमच्या मनाचे ऐकूनच निर्णय घ्यावे लागतील. दुसरे लोक काय सांगतात किंवा त्यांचे विचार काय आहेत याकडे दुर्लक्ष करावे. अनावश्यक खर्च टाळावे लागतील अन्यथा आर्थिक स्थिती खराब होईल. आजच्या दिवशी तुम्हाला कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील वातावरण तणावपूर्वक असेल.

    कन्या : आज जवळच्या लोकांशी मनभरून गप्पागोष्टी केल्याने तुम्ही प्रसन्न असाल. नोकरी व्यवसायात अनुभवी व वरिष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी गमावू नका. आजच्या दिवशी व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. आज कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून किरकोळ वाद होऊ शकतो ज्यामुळे वातावरण तणावपूर्वक असेल.

    तुळ : आज तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात कोणत्याही व्यक्तीसोबत राजनीती किंवा कूटनीतीमध्ये सामील होण्यापासून वाचावे लागेल. आज मनात एखादे काम करण्यासाठी उत्साह आणि जोश दिसून येईल. खाण्यापिण्याचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी दिवस उत्तम असेल. आज कोणावरही अतिविश्वास दाखवू नका.

    वृश्चिक : आज तुमच्या मनात उदारता असेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील. आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करून दागिने खरेदी कराल. जलद धनप्राप्तीसाठी कोणत्याही चुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका अन्यथा नुकसान होईल. विवाहित लोकांना संतान सुख प्राप्ती होईल ज्यामुळे मन आनंदीत असेल.

    वृश्चिक : आज तुमच्या मनात उदारता असेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील. आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करून दागिने खरेदी कराल. जलद धनप्राप्तीसाठी कोणत्याही चुकीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका अन्यथा नुकसान होईल. विवाहित लोकांना संतान सुख प्राप्ती होईल ज्यामुळे मन आनंदीत असेल.

    मकर : आज तुमच्या दिवसाची सुरुवात नवीन उमेद आणि उत्साहाने होईल. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगला नफा होईल. व्यापारात काही बदल होतील त्यामुळे अनुभवी लोकांचा सल्ला अवश्य घ्या. विदेशात व्यापार करणाऱ्या लोकांना आज लाभ मिळेल. विदेश यात्रा होईल.

    कुंभ : आज तुम्हाला तुमच्या दिनचर्येत थोडा बदल करावा लागेल. लवके उठावे व सर्व कामे नियोजन करून आज पार पाडावीत. आज तुम्हाला तुमचा छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. एखादे नवीन काम तुम्ही आज सुरु करू शकता. आर्थिक बाबतीत सर्व ठीक असल्याने मन शांत असेल. कौटुंबिक संबंध गोड असतील.

    मीन : आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणे राग करणे टाळावे लागेल. एखाद्या महत्वाच्या गोष्टीबाबत तुमचे विचार आज अचानक बदलू शकतात. ऑनलाईन व्यापार करणाऱ्यांना आज आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही योजना आखाव्या लागतील. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तुमच्या नातेसंबंधांमध्ये तुमच्या अपेक्षा वाढतील. तुमच्या मुलांप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील

    April 24, 2026

    कामाच्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या चांगल्या संधी मिळतील,

    April 23, 2026

    आज तुम्ही कामासाठी प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरेल.

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.