Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू
    क्राईम

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शेतात पाणी भरण्यासाठी जात असलेल्या जगदिश अशोक पाटील (वय ३७, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) या तरुण शेतकऱ्याला जळगावकडून जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या भीष अपघातात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील नेवरा मारोती मंदिराजवळ घडली. चालक वाहन घेवून पळून जात असतांना ग्रामस्थांनी पाठलाग करीत वाहन पकडले तर चालक वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार,  तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील जगदीश अशोक पाटील (वय ३७) हे तरुण शेतकरी असून त्यांचे पाचोरा रस्त्यावर शेत आहे. शनिवारी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जगदिश पाटील हे (एमएच १९, ईयू ११६५) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. शिरसोलीकडून वावडद्याकडे जात होते. नेवरा मारुती मंदिराजवळ पोहोचले. यावेळी पाचोऱ्याकडून जळगावकडे अत्यंत वेगात येणाऱ्या महिंद्रा वाहनाने (एमएच २०, ईजी ६५२९) क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या अपघातात दुचाकीस्वार जगदीश पाटील हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून चेंदामेंदा झाला होता.

    मालवाहू वाहनाने धडक दिल्यानंतर तो वाहन घेवून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू ग्रामस्थांनी त्या वाहनाचा पाठलाग करून नायरा पेट्रोल पंपाजवळ वाहन अडवले. मात्र वाहन चालक हा वाहन सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जगदिश पाटील यांचे चुलत भाऊ अनिल वसंत पवार आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी जगदीश पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयता दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले. पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अपघात ग्रस्त वाहने ताब्यात घेतले. धडक देणारे वाहन त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अनिल वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.