Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !
    क्राईम

    दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !

    editor deskBy editor deskFebruary 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    बी फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या शाम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह. मु. दौलत नगर) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड तालुक्यातील शाम पाटील हा तरुण शहरातील एका महाविद्यालयात बी-फार्मसीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो दौलत नगरात मित्रासोबत खोली करुन राहत होता. रविवारी त्याचा मित्र बाहेर गेलेला असतांना शाम याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास शाम याचा मित्र रुमवर आला, परंतू दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा ठोठावत होता. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्या तरुणाने घटनेची माहिती घर मालकाला दिली. त्यानुसार त्यांनी रुमचा दरवाजा तोडला असता, शाम हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

    घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोहेकॉ अजित पाटील, निलेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयव रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026

    पोटगीच्या वादातून सूडाचा कट; पोलिस उपनिरीक्षकाच्या घरास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.