Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोट्यवधींची रोकड न भरताच उपनिरीक्षक बेपत्ता; दक्षता पेट्रोलपंपातील आर्थिक गैरव्यवहाराचा संशय
    क्राईम

    कोट्यवधींची रोकड न भरताच उपनिरीक्षक बेपत्ता; दक्षता पेट्रोलपंपातील आर्थिक गैरव्यवहाराचा संशय

    editor deskBy editor deskFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील कोट्यवधी रुपयांची रोकड बँकेत जमा न करता उपनिरीक्षक वाल्मिक मधुकर वाघ (वय ५७, रा. साईनगर, निमखेडी) हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा पेठ परिसरात पोलिस वेल्फेअर विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. येथे पेट्रोल विक्रीतून दररोज मोठ्या प्रमाणात रोकड जमा होते. नियमानुसार ही रक्कम दररोज हिशोब करून वेल्फेअर विभागाच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. सदर जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

    मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पेट्रोलपंपावरील जमा रक्कम बँकेत भरली नसल्याचे उघड झाले आहे. या कालावधीत जमा झालेली रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकी किती रक्कम शिल्लक आहे, याबाबत सध्या लेखापरीक्षण सुरू असून त्यानंतरच अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दि. ११ फेब्रुवारी रोजी वाल्मिक वाघ हे दुचाकीवरून घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. घरातून जात असल्याची माहिती त्यांनी मुलाला दिली होती. त्यानंतर मुलाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

    या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून आर्थिक गैरव्यवहार, रोकड अपहार किंवा अन्य कारणांमुळे बेपत्ता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून लेखापरीक्षण अहवालानंतर प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.