Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गॅस कटरने कपाटाचे कुलूप तोडून दागिने लंपास !
    क्राईम

    गॅस कटरने कपाटाचे कुलूप तोडून दागिने लंपास !

    editor deskBy editor deskFebruary 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील भरवस्तीत चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने जमीला कुरेशी यांच्या घरातील कपाट फोडून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. आठ दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जमीला रऊफ कुरेशी या ६ रोजी आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्याने त्या तेथेच थांबल्या. दरम्यान, गुरुवारी त्यांनी मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले असता मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश करताच दोन्ही खोल्यांचे कडी-कोयंडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

    गॅस कटरने कपाटाचे कुलूप कापले एका खोलीतील पेटी फोडलेली तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे कुलूप तोडण्यात आले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे कुलूप गॅस कटरने कापल्याचे दिसून आले. घरातील पलंग, बॅगा, पिशव्या व तिजोरी अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्याने चोरट्यांनी सखोल शोधाशोध केल्याचे निष्पन्न झाले. या घरफोडीत अंदाजे ९५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली असून एका गल्ल्यातील रक्कम नेमकी किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाऊण ते एक किलो वजनाचे चांदीचे दागिने व तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.