Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर
    क्राईम

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    editor deskBy editor deskFebruary 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    ऑनलाइन कर्ज अॅपवरून कर्ज घेणे शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल व संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती अॅपवर अपलोड केली. हे कर्ज त्यांनी आठ दिवसांत पूर्णपणे फेडले. मात्र, अॅपकडून कर्ज न भरल्याचा दावा करत तत्काळ हप्ता भरण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी कर्ज भरल्याचे पुरावे पाठवूनही संबंधितांकडून त्रास सुरूच राहिला. ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ असे सांगून त्यांनी फोन कट केला.

    यानंतर काही वेळातच संबंधित हॅकरने संबधितांचे अश्लील फोटो तयार करून या कर्मचाऱ्याच्या मित्र-मैत्रिणी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठवले. हा प्रकार लक्षात येताच तायडे घाबरले आणि त्यांनी तत्काळ बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, ऑनलाइन कर्ज अॅपच्या वाढत्या फसवणूक प्रकारांमुळे नागरिकांनी वैयक्तिक माहिती देताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आयटी क्षेत्रातील तरुणीचा गंभीर आरोप; फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी तपासाची मागणी !

    April 12, 2026

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.