Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या
    क्राईम

    मजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    editor deskBy editor deskFebruary 10, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घराशेजारी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या दोरीला गळफास घेत रियाज जोहबा तडवी (वय १९, मूळ रा. लोहारा, ता. रावेर, ह. मु. सुप्रिम कॉलनी) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील लोहारा येथील रियाज तडवी हा तरुण कुटुंबासह सध्या सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता. तो मजुरीचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्यांच्या घराशेजारी कार्यक्रम असल्यामुळे मंडप उभारण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रियाज याने मंडपाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.

    शनिवारी पहाटे ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले. रियाज तडवी याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दारूच्या नशेत तरुणांकडून जळगावात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की !

    February 10, 2026

    झेलम एक्सप्रेसमध्ये १.६५ लाखांचे दागिने चोरी; जळगाव पोलीसांच्या ताब्यात रेकॉर्डवरील आरोपी

    February 9, 2026

    मुलीच्या मागणीनुसार पाठवलेले फोटो; आईने पोलिसात तक्रार केली

    February 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.