Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » व्हॅलेंटाइन वीक 2026: 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे आठ खास दिवस
    lifestyle

    व्हॅलेंटाइन वीक 2026: 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे आठ खास दिवस

    editor deskBy editor deskFebruary 7, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण व्हॅलेंटाइन वीकच्या तयारीला लागतात. कारण हा आठवडा आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. व्हॅलेंटाइन वीक म्हणजे फक्त गिफ्ट्स देणं-घेणं नाही, तर आपल्या मनातल्या भावना पार्टनरपर्यंत पोहोचवण्याचा एक खास मार्ग आहे.

    7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा प्रेमाचा आठवडा आपल्या भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी उत्तम ठरतो. याच काळात आपण आपल्या पार्टनर, क्रश किंवा लाइफ पार्टनरसाठी ते आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत, हे दाखवू शकतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर चला जाणून घेऊया, 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक खास दिवस कसा अधिक खास आणि लक्षात राहणारा बनवता येईल.

    7 फेब्रुवारी: रोज डे

    प्रेमाची सुरुवात नेहमी साधेपणा आणि गोड भावनांनी व्हावी, म्हणूनच वॅलेंटाइन वीकचा पहिला दिवस ‘रोज डे’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त कपल्ससाठीच असतो असं नाही; एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण असेल, तरी त्यांना पिवळा गुलाब देऊन आपुलकी व्यक्त करता येते. जर तुम्ही नेहमीच तुमच्या गर्लफ्रेंडला गुलाब देत असाल, तर यंदा थोडा वेगळा विचार करा गुलाब एखाद्या आवडत्या पुस्तकात ठेवून द्या. पुस्तकात ठेवलेला गुलाब हळूहळू सुकतो, पण तो सुकलेला गुलाब आठवणी जपून ठेवण्याचं एक सुंदर प्रतीक बनतो.

    8 फेब्रुवारी: प्रपोज डे

    वॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा दिवस मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी खास मानला जातो. प्रपोज करणं म्हणजे फक्त लग्नाचा प्रस्ताव ठेवणं एवढंच नसून, आपल्या पार्टनरवरचं प्रेम पुन्हा एकदा शब्दांत सांगणं किंवा भविष्यात आपण दोघं कसं एकत्र पाहतो हे शेअर करणंही होय. मोठ्या, गोंगाटाच्या ठिकाणांपेक्षा शांत वातावरणात संध्याकाळच्या वेळेस हलक्या फिरताना किंवा एखाद्या पार्कमध्ये बसून मनापासून आपल्या भावना सांगितल्या, तर तो क्षण अधिक खास आणि लक्षात राहणारा ठरतो.

    9 फेब्रुवारी: चॉकलेट डे

    नात्यात गोडवा वाढवणारा दिवस म्हणजे चॉकलेट डे. प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेटपेक्षा सुंदर माध्यम क्वचितच असतं. चॉकलेट केवळ चवीपुरतंच मर्यादित नसून, आनंद देणारे हार्मोन्स रिलीज करण्यातही मदत करतं. या दिवशी पार्टनरसाठी खास कस्टमाइज्ड चॉकलेट बॉक्स तयार करा, ज्यात तिच्या आवडत्या फ्लेवर्स असतील. असा विचारपूर्वक दिलेला गिफ्ट तिला नक्कीच खूप आनंद देईल.

    10 फेब्रुवारी: टेडी डे

    10 फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. पार्टनर जवळ नसली, तरी तिला एक गोंडस टेडी बेअर गिफ्ट करा. तो टेडी तिच्यासाठी तुमच्या आठवणींचं प्रतीक बनेल आणि जेव्हा जेव्हा ती त्याला पाहील, तेव्हा तुम्ही नक्कीच तिच्या मनात असाल.

    11 फेब्रुवारी: प्रॉमिस डे

    प्रॉमिस डे हा नात्याची पायाभरणी अधिक मजबूत करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी मोठमोठी आश्वासनं देण्यापेक्षा लहान, खर्‍या आणि निभावता येतील अशी वचनं देणं अधिक महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, “मी नेहमी तुझं ऐकून घेईन” किंवा “प्रत्येक अडचण आपण दोघं मिळून पार करू.” यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने एक छोटंसं पत्र लिहून त्यात 2-3 प्रॉमिस नमूद करू शकता.

    12 फेब्रुवारी: हग डे

    एक प्रेमळ मिठी सगळा थकवा दूर करते आणि दोन व्यक्तींना अधिक जवळ आणते. हगची भाषा वेगळीच असते ती शब्दांशिवाय भावना व्यक्त करते. त्यामुळे या दिवशी सुरुवात पार्टनरला एक घट्ट, मनापासूनची मिठी देऊन करा. कारण कधी कधी एक हगच सर्व काही सांगून जातो.

    13 फेब्रुवारी: किस डे

    भावनिक नातं अधिक घट्ट करण्यासाठी किस डे साजरा केला जातो. कपाळावर दिलेला किस हा आदर, जिव्हाळा आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानला जातो. अशा छोट्या पण अर्थपूर्ण कृतीतून पार्टनरला आपण किती काळजी घेतो, हे सहज व्यक्त करता येतं. या दिवशी प्रेम व्यक्त करताना साधेपणातच खरी भावना दिसून येते.

    14 फेब्रुवारी: व्हॅलेंटाइन डे

    संपूर्ण आठवड्यात व्यक्त केलेल्या सगळ्या भावना एकत्र येण्याचा दिवस म्हणजे वॅलेंटाइन डे. या दिवशी तुम्ही घरच्या घरी खास डिनर डेट प्लॅन करू शकता, एखाद्या छोट्या ट्रिपला जाऊ शकता किंवा शांतपणे एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. महत्त्वाचं हेच की आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवून त्याला खास असल्याची जाणीव करून द्यावी.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.