Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता
    क्राईम

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    editor deskBy editor deskFebruary 6, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलिस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा मृतदेह नांदवेल फाट्याजवळील जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला बुधवारी (दि. ५) सकाळी सात वाजता आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    या घटनेची माहिती नांदवेल गावचे पोलिस पाटील अनिल वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुकेश तायडे हे पशुवैद्यकीय व्यवसाय करत असून मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी सेवा देत होते. नांदवेल गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत मुक्ताईनगर पोलीस अधिक तपास करत असून अपघातासह अन्य शक्यतांचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे मानपूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव कारने मांडला मृत्यूचा तांडव; एक ठार, पाच जण गंभीर

    June 16, 2026

    पाऊस दडी मारताच वाढली चिंता; अल्पभूधारक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

    June 16, 2026

    मॉर्निंग वॉक ठरला महागात; पत्ता विचारत वृद्धेची दीड लाखांची सोनपोत लंपास

    June 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.