Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !
    क्राईम

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2026Updated:February 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी 

    रावेर-विवरा रोडवर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज दि. ४ रोजी दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबतचे वृत्त असे की विवरे खुर्द येथील शुभम गजानन लोखंडे हा त्याच्या आजीसह मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी ए ८८४५ या मोटरसायकलने विवरे खुर्द येथून रावेर येथे येत असताना रावेरकडून विनय विजय भालेराव (रा. कोळोदा) हा मोटरसायकल क्रमांक एमएच १९ डीएस ५३२३ ने जाताना येथील मात्राण नदी पुलाजवळ विनय भालेराव यांच्या मोटरसायकलीने समोरील येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे या अपघातात शुभम गजानन लोखंडे (वय २०) व विनय विजय भालेराव (वय २४, रा. कोळोदा) यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर शुभम लोखंडे याची आजी सुमित्राबाई जयवंत लोखंडे (वय ७०) या गंभीर जखमी झाल्या.

    यामुळे त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत प्रकाश लक्ष्मण लोखंडे (रा. विवरे खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हमिद तडवी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026

    नफ्याच्या आमिषातून फसवणूक, नकारानंतर विनयभंग; गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.