Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ५०० रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून खेळण्यातील नोटांनी सहा लाखांची फसवणूक
    क्राईम

    ५०० रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून खेळण्यातील नोटांनी सहा लाखांची फसवणूक

    editor deskBy editor deskFebruary 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बारदान खरेदीसाठी ५०० रुपये चलनाच्या नोटा लागतील असे सांगत त्या उपलब्ध करून देण्यासाठी अस्सल नोटा घेऊन व्यापाऱ्याला मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २३ जानेवारी रोजी काव्यरत्नावली चौक परिसरात घडला. याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बारदान विक्रेते प्रकाश श्रीराम प्रजापत (५०, रा. प्रजापत नगर) यांना काही दिवसांपूर्वी रवींद्र तायडे नामक व्यक्तीने कॉल करून २ लाख बारदान विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानंतर दि. २३ जानेवारी रोजी तायडे एका साथीदारासह प्रजापत यांच्या घरी आला व व्यवहारासाठी प्रजापत यांना काव्यरत्नावली चौकात नेले.

    काव्यरत्नावली चौकात ठगांच्या तिसऱ्या साथीदाराने प्रजापत यांच्याकडील एक लाख रुपये बयाणा म्हणून घेतले आणि उर्वरित ५ लाख रुपयांच्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात त्यांना ५०० रुपये चलनाच्या नोटांचे १० बंडल एका पिशवीत दिले. दुसऱ्या दिवशी प्रजापत यांनी घरी पैसे तपासले असता प्रत्येक बंडलच्या वरची एक नोट खरी होती आणि बाकी सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेले होते.

    फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तणावामुळे प्रजापत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रवींद्र तायडे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास सहायक निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.