Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंजोबा मंदिर परिसरात ट्रक–स्कॉर्पिओ धडक; वाहन पलटी
    क्राईम

    मुंजोबा मंदिर परिसरात ट्रक–स्कॉर्पिओ धडक; वाहन पलटी

    editor deskBy editor deskFebruary 1, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    नाशिराबाद येथील मुंजोबा मंदिर परिसरात आज भीषण अपघात घडला. एमएच २८ व्ही ६१५१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला जीजे३६ ३३४२ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील पार्थ गावंडे (वय १७) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधील कुटुंब हे तेल्हारा येथील असून ते देवदर्शनासाठी अमळनेर येथे गेले होते. वाहनात लहान मुले व महिलाही असल्याने अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रक जागीच सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील कुटुंब अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होते. नातेवाईक येईपर्यंत त्यांची कोणतीही सोय नसल्याने नशिराबाद येथील नगरसेवक प्रदीप बोढरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत या कुटुंबाला आपल्या निवासस्थानी आश्रय दिला.

    त्यांनी कुटुंबाला धीर देत सर्व आवश्यक व्यवस्था स्वतःच्या घरी करून दिली. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी पुढील कार्यवाही नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.