जळगाव : प्रतिनिधी
पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती घेतांना मोबाईलवर आलेली लिंक चुकून क्लिक झाल्याने माधवदास खिल्लुमल शुगानी (वय ७९, रा. अमळनेर) यांची ७लाख ८९ हजारात तर खासगी वाहन चालक शेख शरीफ शेख खलील (वय ३१, रा. मेहरुण) यांना फ्रेन्चाईसी मिळवून देतो असे म्हणत त्यांची ५ लाख ३७ हजारात ऑनलाईन गंडविले. या दोघ घटनांध्ये एकूण १३ लाख २७ हजारात फसवणूक झाल्याने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथून निवृत्त झालेले शिक्षक माधवदास शुगानी हे अमळनेर येथे वास्तव्यास आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याविषयीची माहिती ऑनलाईन शोधली. जास्त रात्र झाल्याने झोप येत असताना मोबाईलवर आलेल्या लिंकला त्यांच्याकडून चुकून टच झाले. त्यानंतर त्यांनी ती लिंक मोबाईलमधून डिलीट केली. आजारी असल्याने त्यांनी दोन दिवस आपला मोबाईल पाहिला नाही. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी बँक बॅलन्स तपासले असता त्यातून सात लाख ८९ हजार ९९२ रुपये कपात झाल्याचे दिसले. त्यांनी लागलीच बँकेत जावून माहिती जाणून घेतली असता, त्यांना ही रक्कम कोणीतरी ऑनलाईन परस्पर काढून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार दि. २३ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेळोवेळी ५ लाख ३७ हजारांची रक्कम दिल्यानंतरही फ्रेन्चाईसी मिळाली नाही. तसेच दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.



