Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबादजवळ भीषण अपघात : टायर फुटून कार उलटली, तरुणीचा मृत्यू
    क्राईम

    नशिराबादजवळ भीषण अपघात : टायर फुटून कार उलटली, तरुणीचा मृत्यू

    editor deskBy editor deskJanuary 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    चारचाकी वाहनाचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार डिव्हायडर तोडून उलटली. त्याचवेळी ही कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धडकली. यात भुसावळ येथील तरुणीचा मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, झोया नदीम पठाण (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे तर वाहनचालक अरबाज खान (२६, रा. खडका रोड, रजा टॉवर परिसर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. जळगावहून भुसावळकडे येणारी कार नशिराबाद टोलनाक्याजवळ पोहोचली असता अचानक वाहनाचे पुढील टायर फुटले. त्यावेळी हा अपघात घडला. जखमी तरुणास गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

    घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच नशिराबाद पोलिस तसेच आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.