Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगांवात उद्योग व रोजगारनिर्मितीचा मास्टरस्ट्रोक,
    राजकारण

    आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगांवात उद्योग व रोजगारनिर्मितीचा मास्टरस्ट्रोक,

    editor deskBy editor deskJanuary 22, 2026No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस (स्वित्झर्लंड) येथे घडला. जागतिक आर्थिक परिषद (World Economic Forum – WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाले असून, महाराष्ट्र शासनाने SAF प्रकल्पासाठी अमेरिका स्थित सॅन फॅन्सीस्को येथील ACTUAL HQ या कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

    शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार असून, यामुळे तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.

    राज्यात मोठी गुंतवणूक यावी, नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योगजगताशी चर्चा करीत आहेत. याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते. वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगांव येथे मोठा उद्योग येणार असून त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही असे सूतोवाच केले होते, अखेर आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला असून, चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे.

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण, Actual HQ” या कंपनीचे सह-संस्थापक (Co-Founder) आणि अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन, Actual HQ कंपनीच्या Strategic Origination (रणनीतिक प्रकल्प शोध व भागीदारी) विभागाच्या प्रमुख ऑरोरा चिस्टे आदी उपस्थित होते.

    ACTUAL HQ व Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या सुमारे 2000 एकरांच्या Sustainable Industrial Zone चा हा प्रकल्प भाग असणार आहे. पुणे आधारित Sankla Group ला 30 वर्षांहून अधिक काळाचा औद्योगिक व बांधकाम क्षेत्रातील अनुभव असून, स्वच्छ ऊर्जा, जैवइंधन, शाश्वत औद्योगिक विकास आणि ग्रामीण रोजगार या क्षेत्रांवर कंपनीचा विशेष भर आहे.

    या प्रकल्पाअंतर्गत चाळीसगांव येथे अंदाजे १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस पाचट, कापूस काड, सोयाबीन भूसा, तूर काड, बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून Sustainable Aviation Fuel (SAF) तयार केले जाणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
    संपूर्ण प्रकल्प 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असणार असून, BESS सह 24×7 वीज, 100 टक्के पाणी पुनर्वापर, EV ट्रकद्वारे वाहतूक, तसेच ESG (Environment, Social, Governance) निकषांचे पूर्ण पालन केले जाणार आहे.

    प्रकल्पासाठी चाळीसगांवच का ?

    मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
    या महाप्रकल्पातून थेट 3000 हून अधिक रोजगार निर्मिती होणार असून, शेतकरी, वाहतूक, सेवा क्षेत्र आणि पुरवठा साखळीच्या माध्यमातून हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी माल व कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे.

    भारत सरकारच्या SAF धोरणानुसार आणि ICAO च्या CORSIA नियमांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प 2070 नेट-झिरो उत्सर्जन उद्दिष्टांच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. पारंपरिक एव्हिएशन इंधनाच्या तुलनेत SAF मुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 80 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.

    या करारानंतर प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की “आजचा दिवस चाळीसगांव मतदारसंघासाठी ऐतिहासिक आहे, जागतिक उद्योग पटलावर चाळीसगावचे नाव प्रथमच आले असून लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मतदारसंघात काम करत असताना सिंचन, रस्ते, दळणवळण यासोबतचं नवीन उद्योग व त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती तसेच शेतकऱ्यांची उत्पन वाढ व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील होतो. गेल्या वर्षभरापासून याबाबत बोलणी व पाठपुरावा सुरू होता. आज अखेर याचा एक मोठा टप्पा पार झाला असून महाराष्ट्र सरकारने SAF प्रकल्पासाठी ACTUAL HQ आणि Sankla Renewables Pvt. Ltd. या दोन्ही कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. ही फक्त सुरुवात असून अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने दूर करून चाळीसगांवच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या साथीने व चाळीसगांवच्या जनतेच्या आशिर्वादाने पूर्ण करू” असा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवला.

    Actual HQ कंपनीचे अध्यक्ष डॉ. कार्तिक बालकृष्णन व Strategic Origination विभागाच्या प्रमुख ऑरोरा चिस्टे यांनी सांगितले की “भारताला SAF उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा आमचा संकल्प असून चाळीसगावमधील हा प्रकल्प पूर्णपणे शाश्वत आणि जागतिक दर्जाचा असेल, महाराष्ट्राला SAF क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे परिपूर्ण सहकार्य आम्हाला मिळत आहे”

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चाळीसगाव तालुक्यासाठी रोजगार, उद्योग, शेतकरी उत्पन्न आणि पर्यावरण संरक्षण या सर्वच आघाड्यांवर क्रांतिकारी बदल घडवणारा हा १५ हजार कोटींचा SAF महाप्रकल्प प्रत्यक्षात येत असून, “शब्द दिला तो पूर्ण केला” हे पुन्हा एकदा आमदार मंगेश चव्हाण यांनी सिद्ध केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मू-काश्मीरमध्ये शोकांतिका; लष्कराची बुलेटप्रूफ गाडी 200 फूट दरीत !

    January 22, 2026

    अचलपूरमध्ये भाजप–एमआयएम युतीच्या चर्चांचे खंडन !

    January 22, 2026

    मतदानापूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा; डिसेंबरचा हप्ता खात्यात

    January 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.