जळगाव : प्रतिनिधी
भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे पुष्पाबाई काशीनाथ पाटील (रा. फूलगाव, ता. भुसावळ) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा महेंद्र पाटील हा जखमी झाला. हा अपघात २० जानेवारी रोजी साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील महेंद्र पाटील हे आई पुष्पाबाई यांच्यासह दुचाकीने जळगावकडे येत होते. साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात पुष्पाबाई पाटील या यांचा मृत्यू झाला. तसेच महेंद्र पाटील हे जखमी झाले. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रशांत विरणारे करीत आहेत.



