Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरमध्ये रेल्वे अपघात; न्यु इंग्लिश स्कूलच्या शिक्षकाचा मृत्यू !
    क्राईम

    अमळनेरमध्ये रेल्वे अपघात; न्यु इंग्लिश स्कूलच्या शिक्षकाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    अमळनेर शहरातील ढेकू रोडवर वास्तव्यास असलेले खाजगी शाळेचे शिक्षक सुरेश सिताराम सोये यांचा काल दि.१८ रोजी सकाळी १० वाजता रेल्वे अपघातातात मृत्यू झाल्याची घटना चांदणी कुहे गावाजवळ सती माता मंदिराजवळ घडली. ते न्यु इंग्लिश स्कूल नांदेड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी श्रीम. प्रमिला मोरे या जि. प.शाळा निपाणे ता. एरंडोल येथे प्राथमिक शिक्षिका आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीी घरातून ते अचानक बेपत्ता झाले होते, कोकणात ते सापडल्याने तेथून त्यांना परत आणले होते. दोन ते तीन दिवस घरीच थांबल्यावर दि.१८ रोजी सकाळी घरातून ते बाहेर पडले आणि सती माता मंदिराजवळ घटनास्थळी पोहोचले तेथे हावडा अहमदाबाद रेल्वे गाडी खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. गळ्यातील चेन व अंगठी यावरून त्यांची ओळख पटली. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

    या घटनेने ढेकूरोड परिसरात शोककळा पसरली. चोपडा तालुका पंचक येथील ते मूळ रहिवासी असून रात्री उशिरा अमळनेर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्न , एक मुलगी असा परिवार असून ते जैतपीर येथील ग्रामपंचायत अधिकारी अभय विठ्ठल मोरे यांचे मेव्हणे होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.