जनतेच्या प्रेमातून उमटतोय विश्वासाचा आवाज
जळगाव | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ९ मध्ये सध्या निवडणूक प्रचाराला भावनिक वळण मिळत असून, महायुतीच्या उमेदवार जयश्री राहुल पाटील यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रेम, विश्वास आणि भावनिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणाऱ्या राहुल पाटील यांच्या कार्याची पावती आज जनता स्वतः शब्दांत आणि कृतीतून देताना दिसत आहे.
घराघरांत सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिक पुष्पगुच्छ देत, औक्षण करत आणि विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देत जयश्री राहुल पाटील यांचे स्वागत करत आहेत. “हे केवळ प्रचार नाही, तर नात्यांची जपणूक आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत असून, मागील काळात केलेल्या कामांचीच ही पावती असल्याचे बोलले जात आहे.
या भावनिक क्षणांमध्ये जयश्री राहुल पाटीलही मतदारांशी मनमोकळा संवाद साधताना दिसत आहेत. त्या म्हणतात,
“मी तुमची नगरसेवक म्हणून नाही, तर तुमची मुलगी, सून म्हणून काम करायला आली आहे. तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न हे माझे स्वतःचे समजून सोडवण्याचा प्रयत्न करेन. मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, हीच विनंती करण्यासाठी तुमची मुलगी आज तुमच्या दारात उभी आहे.”या शब्दांमुळे अनेक ठिकाणी भावनिक वातावरण निर्माण होत असून, काही ठिकाणी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत पाटील यांना भरभरून आशीर्वाद दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रभाग ९ मध्ये उमेदवार आणि मतदार यांच्यातील हे आपुलकीचे नाते आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
एकूणच, प्रभाग ९ मध्ये विश्वास, भावना आणि कामाच्या पावतीवर आधारित प्रचार सुरू असून, जयश्री राहुल पाटील यांना मिळणारा हा जनतेचा प्रतिसाद त्यांच्या विजयासाठी आशादायक मानला जात आहे.



