महायुतीकडून शक्तिप्रदर्शन, दिग्गज नेत्यांची उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, याच अनुषंगाने महायुतीकडून एक भव्य व निर्णायक महा सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या सभेतून प्रभागातील विकासाची दिशा ठरवणारा स्पष्ट संदेश दिला जाणार आहे.
या भव्य सभेला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री आदरणीय श्री. गुलाबराव पाटील साहेब तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री. राजूमामा भोळे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. दोन्ही मान्यवर नेते सभेतून नागरिकांशी थेट संवाद साधत, महायुतीची भूमिका, विकासाचा आराखडा आणि प्रभाग ९ साठीची भावी दृष्टी मांडणार आहेत.
यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील,सौ. जयश्री राहुल पाटील
हे सर्व उमेदवार नागरिकांसमोर आपले विचार मांडून, प्रभागाच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, महिला व युवक सक्षमीकरण यांसारख्या मुद्द्यांवर आपली ठोस भूमिका स्पष्ट करणार आहेत.
प्रभाग ९ च्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे या सभेतून अधोरेखित केले जाणार असून, नागरिकांचा थेट सहभाग आणि पाठिंबा मिळवणे हा या सभेचा प्रमुख उद्देश आहे. “आपली उपस्थितीच उद्याचा निकाल ठरवणार आहे” असा विश्वास व्यक्त करत, आयोजकांकडून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
ही महा सभाचंदू अण्णा नगर चौफुली येथे.दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. एकूणच, प्रभाग ९ चा आवाज बुलंद करत, महायुतीच्या चारही उमेदवारांच्या भक्कम विजयासाठी ही सभा निर्णायक ठरण्याची शक्यता असून, या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



