घराघरातून मिळणाऱ्या पाठिंब्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी):
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना प्रभाग क्रमांक ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, उत्स्फूर्त स्वागत आणि थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
प्रभागातील विविध भागांत सुरू असलेल्या प्रचार फेऱ्या, घरभेटी आणि कॉर्नर सभांमधून जयश्री राहुल पाटील विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत असून, स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत आहेत. नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि महिलांसाठी सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासाचा मुद्दा मतदारांना भावताना दिसत आहे.
प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारांचा वाढता ओढा पाहता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास अधिकच बळावला असून ‘प्रभाग ९ मध्ये परिवर्तन निश्चित’ अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्गाकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.



