जळगाव : प्रतिनिधी
विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या अजय अरुण पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणारा अजय पाटील हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने विषारी औषध प्राशन केल्यामुळे तो अत्यावस्थ अवस्थेत नशिराबाद रस्त्यावरील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत होता. याबाबतची माहिती अजय पाटील याचा भाऊ नितीन पाटील याला मिळाल्यानंतर त्याने लागलीच अजय पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



