जळगाव : प्रतिनिधी
दुकानाजवळ लघुशंका करून घाण करतात या संशयावरून दोन व्यापाऱ्यांत वाद झाला. एका व्यापाऱ्याने शिवीगाळ करून दुसऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यात इलेक्ट्रिक शेगडीची तांब्याची क्वाइल मारून दुखापत केली. सोमवारी दुपारी १२.१५ वाजता सेंट्रल फुले मार्केटमध्ये ही घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणारा व्यापारी व त्याचा मुलगा अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला.
सविस्तर वृत्त असे कि, अमर चेतनदास कारडा (क्य ३७, रा. सिंधी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार सोमवारी घनश्याम पोपली व त्यांचा मुलगा शेखर पोपली यांनी कारडा यांना दुकानाजवळ लघुशंका करतात असा संशय घेऊन शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या वेळी शेखर पोपलीने त्याच्या सतनाम इलेक्ट्रिकल्स दुकानातील इलेक्ट्रिक शेगडीची कॉपरची क्वाइलने डोक्यात मारून दुखापत केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत शहर पोलिसांत पोपली बापलेकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास इंदल जाधव हे करीत आहे.



